Breaking News
मुंबई ः या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी केंद्र सरकारने अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. या योजनांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवरील व्याजदर 8 टक्क्यांवरुन 8.2 टक्के करण्यात आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी वरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ (एप्रिल ते जून या तिमाहीसाठी) ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2 टक्के, किसान विकास पत्र 7.5 टक्के, एक वर्ष मुदत ठेव 6.8 टक्के, दोन वर्षे मुदत ठेव 6.9 टक्के, तीन वर्षे मदत ठेव 7 टक्के, पाच वर्षे मुदत ठेव 7.5 टक्के , मासिक प्राप्ति योजना 7.4 टक्के , राष्ट्रीय बचत योजना 7.7 टक्के, सुकन्या समृद्धी योजना 8 टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 7.1 टक्के (कोणताही बदल नाही). केंद्र सरकारने सेवानिवृत्ती नियोजनातून जमा केलेल्या पीपीएफ योजनेच्या व्याजदरात पुन्हा एकदा कोणताही बदल केलेला नाही. व्याजदर सलग 12 व्या तिमाहीत बदललेले नाहीत. सध्या या योजनेअंतर्गत सरकार गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज देत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai