Breaking News
मुंबई ः राज्य शासनाने घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेडीरेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या रेडीरेकनर दराप्रमाणे, म्हणजे 2022-23 च्या रेडीरेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे.
सन 2022-2023 च्या दरात कोणताही बदल न करता तो 2023-2024 या सालासाठीही लागू करण्यात यावा असं राज्य शासरनाच्या या आदेशात म्हटलं आहे. मुंबई शहरात मार्च 2023 मध्ये 12,421 युनिट्सची मालमत्ता विक्री नोंदणी झाली, त्यामुळे राज्याच्या महसुलात 1,143 कोटी पेक्षा जास्त भर पडली. एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी 84 टक्के निवासी तर 16 टक्के अनिवासी मालमत्ता होत्या. मार्च 2023 मध्ये 1,143 कोटी महसूल संकलनासह, मुंबईने एप्रिल 2022 पासून सर्वाधिक महसूल संकलन नोंद केल्याचं नाईट फ्रँक या अहवालात म्हटलं आहे. मार्च 2023 मध्ये मालमत्तेच्या नोंदणीतून 37 कोटी प्रतिदिन महसूल संकलन झाले आहे. मुंबईत मार्च 2023 मध्ये 12,421 मालमत्तांची नोंदणी झाली, ही वाढ 28 टक्के इतकी असून या आर्थिक वर्षातील सर्वोत्तम आहे. मार्च 2023 मध्ये मालमत्ता नोंदणींमध्ये घर नोंदणीचे योगदान 84 टक्के होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai