
होल्डींग पाँड, पंप हाऊसची आयुक्तांकडून पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2023
- 262
नवी मुंबई ः ावसाळ्यात काही वेळा अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ एकच झाल्यास शहरातील काही सखल भागामध्ये काही काळ पाणी साचून राहते हा अनुभव लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्यासह सेक्टर 12 सीबीडी बेलापूर तसेच सेक्टर 8 वाशी येथील होल्डींग पाँडना त्याचप्रमाणे तेथे असलेल्या पंप हाऊसला भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
येणाऱ्या पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी आपापली पावसाळापूर्व कामे 25 मे पूर्वी पूर्ण करून सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे. नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. त्यामुळे पावसाळी कालावधीत शहरात पाणी साचण्यापासून सुरक्षा मिळते. सीबीडी बेलापूर आणि वाशी या दोन्ही ठिकाणचे पंप हाऊस हे सिडकोकालीन जुने असून त्यांच्या इमारती जीर्णावस्थेत आहेत. त्यांचे नवीन बांधकाम करण्यासाठी पालिकेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार या दोन्ही ठिकाणी नवीन पंप हाऊस बांधण्यास एमसीझेडएमची परवानगी प्राप्त झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने याकरिता उच्च न्यायालयाकडे परवानगीसाठी रितसर अर्ज दाखल केला आहे. आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेता उच्च न्यायालयाची मंजूरी प्राप्त करून घेऊन पावसाळ्यानंतर लगेचच पंप हाऊस बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सीबीडी बेलापूर व वाशी या दोन्ही ठिकाणी होल्डींग पॉँड परिसराची पाहणी करताना खारफुटीला बाधा न पोहचता व सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन न करता यांत्रिकी पध्दतीने शक्य होईल तेवढा गाळ काढून होल्डींग पॉँडची पाणी साठवण क्षमता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढविण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्यासोबतच एमसीझेडएकडून गाळ काढण्याची परवानगी प्राप्त करण्याचा पाठपुरावा सुरु ठेवावा असेही आयुक्तांनी सूचित केले. पंप हाऊसचे काम करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया पावसाळी कालावधीत पूर्ण करून घ्यावी व पावसाळ्यानंतर लगेचच दोन्ही पंप हाऊसची बांधकामे सुरु करावीत असेही आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. स्वयंचलित फ्लॅप गेट्स सुव्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना करीत आयुक्तांनी आवश्यक त्या ठिकाणी नवीन फ्लॅप गेट्स लावून घ्यावेत असेही निर्देशित केले. पावसाळी कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था कार्यान्वित ठेवावी तसेच पावसाळी कालावधीत सर्व पंप सुरु राहतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे आणि पर्यायी पंपांची व्यवस्था करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची आत्ताच खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना त्वरित करून घ्याव्यात आणि पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आगाऊ दक्षता घ्यावी असेही निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पाहणी दौऱ्यात अभियांत्रिकी विभागास दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai