Breaking News
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये नवी मुंबईतून डॉ.राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्यांना संधी देण्यात आल्याचे या नियुक्त्यांवरून पाहायला मिळत आहे. भाजपचे संघटनात्मकदृष्ट्या राज्यात 78 जिल्हे असून 20 जिल्हाध्यक्षांची निवड अद्याप बाकी आहे. नवी मुंबईतील बेलापुर विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या निकटवत समजल्या जाणाऱ्या डॉ. राजेश पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून रामचंद्र घरत यांनी तीन वर्षापेक्षा अधिक काळ जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर भाजपने माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पाट शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा रामचंद्र घरत यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. डॉ.पाटील यांच्या रुपाने स्थानिक प्रकल्पग्रस्त जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपला लाभला आहे. डॉ.राजेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला असून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai