Breaking News
मुंबई ः जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामणयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यामध्ये ऑनलाईन गेमिंगला जीएसटी अंतर्गत आणणं, 28 टक्के कर लागू करणं आणि कर्करोगाच्या औषधांवरून आयजीएसटी काढून टाकणं यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगला जीएसटी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेदरम्यान, आजच्या काळात ऑनलाईन गेमिंग उद्योगाचा प्रभाव किती आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकतं. या सर्व बाबींवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कार खरेदी करणं महागणार
जीएसटी कौन्सिलनं कार ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बैठकीदरम्यान विस्तृत चर्चा केल्यानंतर, सेडान कार वर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, जी 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त असेल. म्हणजेच, आता या श्रेणीतील वाहनं घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, सेडान कारवर 22 टक्के सेस लागू होणार नाही.
आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलताना, आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर आयजीएसटी लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कॅन्सरवरील औषध ऊळर्र्पुीीींळारल ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान, सध्या यावर 12 टक्के आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.
चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त
चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर सर्वांची एकच तक्रार असले, ती म्हणजे, चित्रपट गृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ. आतापासून खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावालाही परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
हे खाद्यपदार्थ स्वस्त
जीएसटी र्उेीपलळश्र च्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या गोष्टींवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता कच्च्या किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai