
विभागीय आयुक्तांनी घेतला नमो 11 सूत्री कार्यक्रमाचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 17, 2023
- 284
नवी मुंबई ः कोकण विभागात नमो 11 सूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करावा अशा सुचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण विभागीय कायुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या नमो 11 सूत्री कार्यक्रमासंबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त नमो 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमात महिलाना शासकीय योजनेचा लाभ, नमो कामगार कल्याण अभियान, नमो शेततळी अभियान, नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान, नमो ग्रामसचिवालये अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान, नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्य करणे अभियान, नमो तीर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अन्य विभागांशी समन्वय साधून काम करावे अशा सुचना आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी यावेळी दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai