
शिक्षक व पदवीधारकांनी मतदार नाव नोंदणी त्वरीत करावी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 18, 2023
- 186
नवी मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार होऊ ईच्छिणाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पदवीधारकांनी नोंदणी त्वरीत करावी असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याघोषित कार्यक्रमानूसार मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदारसंघाची टप्प्या टप्याने नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. भारत निवडणूकआयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमा नूसार 25 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे. 06 नोव्हेंबर 2023 रोजी नमुना-18 किंवा नमुना-19 द्वारे दावे व हरकती स्विकारणाचा अंतिम दिवस असेल. 20 नोव्हेंबर 2023 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल. 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल. 23 नोव्हेंबर 2023 ते 09 डिसेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारली जातील.25 डिसेंबर 2023 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल. 30 डिसेंबर 2023 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai