Breaking News
नवी मुंबई ः बेलापुर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने वाशीतील अतिधोकादायक इमारतींचे पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. पालिकेने पोलीस संरक्षणात सदरची कारवाई केली.
महानगरपालिका सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी1 (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बी3 टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (बिल्डिंग नं. 1 ते 10), से.2 वाशी यांचा पाणी पुरवठा यापुर्वीच खंडीत केला होता. आता तेथीलल विद्युत पुरवठा व मलनिःसारण वाहिनी खंडीत करण्यात आला आहे. मे. नुर को ऑप हो सो लि, प्लॉट नं-18, सेक्टर-09 ए, वाशी, आणि मे. ऊर्जा को ऑप हो सो लि, प्लॉट नं -6, सेक्टर-10 ए,वाशी, यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या धडक मोहिमेसाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी व स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुरांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai