
शेकापने फोडली दुहेरी मालमत्ता कराची हंडी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 20, 2022
- 473
पनवेल : मनपाच्या अन्यायी लुटीची बेडी तोडू, चला मालमत्ता कराची हंडी सही करून फोडू या घोषणेसह शेतकरी कामगार पक्षा तर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खांदा कॉलनी, कळंबोली इत्यादी परिसरात पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी मालमत्ता कराची दहीहंडी सही करून फोडली.
पनवेल महानगरपालिकेने स्थापना झाल्यानंतर एकत्रित चार वर्षाचा कर सर्व नागरिकांना लावला. परंतु सदर कर हा सिडको ने सुद्धा या अगोदर नागरिकांकडून वसूल केला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेतून नागरिकांवर लादलेला हा अन्यायकारक दुहेरी मालमत्ता कर हा रद्द करण्यात यावा आणि नागरिकांना योग्य तो करत लावावा यासाठी गेली काही वर्षे शेतकरी कामगार पक्ष विविध प्रकारे आंदोलने करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुहेरी मालमत्ता कराची हंडी सह्यांच्या रूपाने फोडून पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांचा निषेध आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या आगळावेगळा दहीहंडीचे नियोजन करण्यात आले असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील साहेब , शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेकाप जिल्हा सहचिटणीस प्रभाकर कांबळे, महादेव वाघमारे कार्याध्यक्ष शेकाप गणेश पाटील (उपनगराध्यक्ष पमपा), सारिका अतुल भगत (मा.नगरसेविका पम पा), अनिल बंडगर (शहर अध्यक्ष), किरण घरत(उपाध्यक्ष), योगेश कोठेकर (कार्याध्यक्ष),सागर भडांगे, संतोष सावंत, श्याम लागडे, रोहन वटकर,अतुल भगत, किशोरी पाटील(महिला उपाध्यक्ष), नलिनी जाधव, निर्मला गुंडरे, आश्विनी जोगदंड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai