
पुनाडे धरण स्वच्छता अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2022
- 716
उरण ः पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने व स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवार, 29 मे 2022 रोजी सकाळी उरण तालुक्यातील पूनाडे धरण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
पुनाडे धरण परिसरात काही मद्यपींनी मद्यपान करुन दारुच्या बाटल्या तेथेच टाकल्या होत्या. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्याही, खाद्यपदार्थांचे पाकीटं यामुळे पसिरस अस्वच्छ झाला होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजात तळागाळात जाऊन संस्था काम करते. पुनाडे धरणावरील स्वच्छता अभियान हा या उपक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमातून दारू पिणारे, पार्टी करणारे यांनी येथे दारूच्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकू नये, स्वछता पाळावी यासाठी या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर ठाकूर यांनी अपघाताची कारणे, अपघातापासून बचाव तसेच स्वरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, आदी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी 200 हुन जास्त दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक,माधव म्हात्रे,पुनाडे येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव ठाकूर, खजिनदार सुरज पवार, सचिव प्रेम म्हात्रे, अभय पाटील, साहिल म्हात्रे, आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai