
घणसोली नाला गाळातच!
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 02, 2023
- 199
नवी मुंबई ः शहरातील मोठमोठ्या नाल्यांमधील गाळ गेली अनेक वर्षे तसाच पडून आहे. घणसोली सेक्टर 9 येथील नालाही असाच गाळाने भरला आहे. गाळ काढण्यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून पालिकेकडे अनेकवर्ष पाठपुरावा सुरु आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या पालिकेने जीसीबीच्या साहाय्याने तात्पुरती मलमपट्टी सुरु केली आहे. मात्र गाळ उपसला जात नसल्याने परिसराला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
घणसोली विभागातील सेक्टर 6,7,9 याठिकाणहून एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारा नाला जातो. या नाल्यात मोठ्या प्रमाणात रसायने सोडली जात असल्याने मोठ्या प्रमाणात पानवेली फोफावली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याभोवती असलेल्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने या नाल्यालगत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रक उभारले आहे. मात्र नाल्यातील गाळ साफ काढण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षांपासून या नाल्यात गाळ साठलेला असल्याने पावसाळयात हा नाला तुडूंब भरत असल्याने सोसायटीच्या ड्रेनेज लाईनमधून पाणी शिरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या नाल्यात 90 टक्के गाळ असल्याने नाल्याची खोली कमी झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडला तर पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढत्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सकाळी या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या समस्येकडे स्थानिकांनी अनेकदा पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी या प्रकरणी दाद मागितली जाणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
घणसोली मधील नाले सफाईसाठी 7-8 वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करा, असे आदेश दिले होते. तरी देखील पालिका प्रशासन दिलेल्या या आदेशांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. -उषा पाटील, माजी नगरसेविका
घणसोली विभागातील इतर नाल्यासंदर्भात कार्यवाही केली जाते. पण मुख्य नाल्यातील गाळासंदर्भात मुख्यालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, याविषयी अनेक निवेदन आली आहेत.- संजय तायडे, विभाग अधिकारी, महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai