सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 06, 2025
- 543
कालावधी उलटला तरी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई नाही
नवी मुंबई ः महापालिकेच्या बेलापुर विभागातील सेक्टर 11 मध्ये बेलापुर भवन ते आयडीबीआय बँक दरम्यान ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेले गटाराचे व पदपथाचे बांधकाम सदोष असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. सदर काम पुर्ण करण्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सदर काम सुरु असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे शहर अभियंता विभागाचे लक्ष लागले आहे.
शहर अभियंता विभागाने 18 नोव्हेंबर 2023 रोजी बेलापुर भवन ते आयडीबीआय बँक तसेच एमटीएनएल कार्यालयासमोरील अंतर्गत रस्त्यावरील पदपथाची स्टॅम्प क्रॉक्रिंटद्वारे सुधारणा करण्याचे काम मे. भारत उद्योग लि.मी. यांना दिले होते. सदर काम पुर्ण करण्याचा कालावधी 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आला होता. सदर काम वेळेत पुर्ण झाले नाही म्हणून संबंधित कामाला 31 मार्च 2025 पर्यंत काम पुर्ण करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. सदर मुदत उलटून गेल्यानंतरही अजूनही काम सुरु असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांना आपल्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत कोणताही दंड संबंधित ठेकेदाराला पालिका अधिकाऱ्यांनी लावला नसल्याचेही नमुद केले आहे.
पाटील यांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आयुक्तांना सांगितले असून त्याबाबतचे पुरावेही जोडले आहेत. कामात सोलिंग न करता पिसीसी करण्यात आल्याचे तसेच पावसाळा सुरु झाल्यानंतरही कामाच्या जागेवरील डेब्रिज व गटारातील साहित्य हटविले नसल्याची बाब आपल्या तक्रारी नमुद केली आहे. या गटारातून त्यांनी अनेक केबल्स टाकल्या असून त्याचा पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होणार असल्याने त्याची वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सुधीर पाटील यांच्या तक्रारीनंतर पालिका अभियांत्रिकी विभाग सक्रिय झाला असून तक्रार निवारणासाठी काम सुधारण्याऐवजी ते सुधीर पाटील यांचे उंबरठे झिजवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, पालिका आयुक्क्त या निकृष्ट बांधकामाबाबत कोणता निर्णय घेतात व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai