Breaking News
नवी मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असून, पावसाळ्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सेवा व्यत्यय कमी करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे या उद्देशाने कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण, रिअल-टाइम देखरेख, गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश करणारा एक सक्रिय आणि व्यापक कृती आराखडा कोकण रेल्वेने कार्यान्वित केला असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पावसाळा कोकण प्रदेशात नैसर्गिक सौंदर्य आणि ऑपरेशनल आव्हाने दोन्ही घेऊन येतो. खडकाळ भूभाग आणि मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्गासाठी (पान 7 वर)
काटेकोर नियोजन आणि सतत दक्षता आवश्यक आहे. कोकण रेल्वेचा सुमारे 738 किलोमीटरचा मार्ग डोंगराळ, जंगलवाटा आणि समुद्रकिनारी झपाट्याने बदलणाऱ्या हवामानातून जातो. त्यामुळे दर पावसाळ्यात रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहते. मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना केल्याची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली.
मान्सून पेट्रोलिंग आणि संवेदनशील ठिकाणी 366 प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले करम्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वेने बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष 24 बाय 7 कार्यरत ठेवले आहेत. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ या 9 प्रमुख ठिकाणी रेल्वे देखभाल वाहने (आरएमव्ही)तैनात आहेत. तर उडुपी, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे तात्काळ कारवाईसाठी टॉवर वॅगन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसह स्वयं-चालित अपघात मदत वैद्यकीय व्हॅन (एआरएमव्ही) रत्नागिरी आणि वेर्णा येथे तैनात आहेत. सुरक्षिततेसाठी ऑपरेशनल समायोजनमुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानतेदरम्यान ट्रेनचा वेग 40 किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान) आणि वशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) या प्रमुख पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लागू राहणार आहे. या कालावधीत हवामानातील बदल लक्षात घेता, गाड्यांच्या गतीमध्ये विभागीय पातळीवर बदल केल्याचे झा यांनी सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर हेसुद्धा उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai