 
                                    		
                            उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण
- by मोना माळी-सणस
- Jun 07, 2025
- 353
पदपथावर लावली वड व पिंपळाची झाडे
नवी मुंबई ः पर्यावरणदिनाच्या निमित्ताने पालिकेच्या उद्यान विभागाने सीबीडी सेक्टर 11 येथील पदपथावर वड आणि पिंपळाची झाडांचे वृक्षारोपण केले आहे. सदर झाडांची प्रवृत्ती व झाडांमध्ये सोडलेले सामायिक अंतर हे पाहिले असता सदर वृक्षारोपण बिनडोक व्यक्तींनी केले असल्याचे दिसून येत आहे. या झाडांमुळे त्या परिसराचे सुशोभिकरण तर होणार नाही परंतु भविष्यात या झाडांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार असल्याने असे बिनडोकपणे वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधूननवी मुंबईत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. दरवष हजारो रोपे लावली जातात मात्र त्यातील किती झाडे जगवली जातात हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. राज्य शासनाने नुकतेच 10 कोटी झाडांचे राज्यभरात वृक्षारोपण करण्याचे जाहीर केले आहे. त्यातभर म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरात अनेक ठिकाणी केलेली वृक्षारोपण थट्टेचा विषय ठरला आहे. बेलापूर मध्ये रेल्वे स्थानकासमोरील पालिकेने पदपथांची दुरुस्ती केली आहे. या पदपथांवर अरुंद व उथळ खड्डे खणून त्यामध्ये वड, पिंपळाच्या रोपांची लागवड केली आहे. वास्तविक पाहता, वड आणि पिंपळ या झाडांची लागवड करताना त्यामध्ये ठराविक अंतर सोडणे गरजेचे असते. ही झाडे जसजसे मोठी होतात तसतसे त्यांची मुळ ते जमीनीत खोल पसरण्यासाठी त्यांना जागेची गरज असते. मात्र येथे सिमेंटच्या पदपथावर छोटे खड्डे करुन ही रोपे लावल्याने पालिकेचा नक्की हेतू काय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. ही झाडे मृत पावल्यास पुन्हा एकदा नव्याने वृक्षारोपण करण्याचे मानस तर उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे तर नाहीना अशी शंका स्थानिक नागरिक घेत आहेत. पदपथांखाली गटारे असल्याने ती त्यात जाऊन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय पदपथ वर्दळीच्या ठिकाणी असल्याने गदच्यावेळी चालतानाही या झाडांची अडचण पादचाऱ्यांना होऊ शकते. ही रोपे पालिकेने मैदाने, गार्डन, टेकडी या ठिकाणी न लावता पदपथांवर लावून वृक्षरोपणाचा केवळ दिखावा केला आहे का अशी चर्चा पादचारी करत आहेत.
वास्तविक पाहता, पदपथांवर अशोक, ताम्हण सारखी सरळसोट वाढणारी झाडे लावल्यास ती जास्त जागा व्यापणार नाहित शिवाय उंच वाढल्याने परिसराच्या सौंर्द्यात भर टाकतील. त्यामुळे अशा ठिकाणी वड, पिंपळ सारखी झाडे न लावता शहराची शोभा वाढवणारी झाडे लावावीत अशी मागणी स्थानिक नागरिक करत असून उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस