ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2025
- 174
नवी मुंबई : नादवेणू संगीत अकादमीच्यावतीने नमोस्तुते पर्व 3 या कार्यक्रमाचे आयोजन 14 जुन रोजी ऐरोली येथे करण्यात आले आहे. बासरी वादक पंडित विवेक सोनार आणि पंडित सत्यजित तळवळकर यांच्यातील जुगलबंदीचे सादरीकरण यावषच्या नादवेणूचे विशेष आकर्षण असणार आहे.
5 ते 75 वय वर्षापर्यंतचे तब्बल 70 बासरी वादक आणि30 हार्मोनियम वादक विविध चित्रपट गीत, लोकगीत आणि शास्त्राय संगीतातील राग याप्रसंगी सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम 14 जून रोजी सायंकाळी 6वा. ऐरोली सेक्टर-5 येथील जानकीबाई मढवी हॉल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात नादवेणूचे संस्थापक बासरीवादक आकाश सूर्यवंशी यांना तबल्यावर साथ देणार आहेत श्रीराज ताम्हणकर. याच कार्यक्रमात अंकिता सूर्यवंशी या एकल हार्मोनियम वादन सादर करणार आहेत. दरवष प्रमाणे यावष देखील नादवेणू तर्फे पंडित विवेक सोनार यांच्या नावाने काही विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक आकाश सुर्यवंशी यांनी सांगितले. नमोस्तुते पर्व 3 रे या अविस्मरणीय कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नादवेणू तर्फे समस्त रसिक प्रेक्षकांना आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai