मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2025
- 158
नवी मुंबई : विकास आराखड्यातून खेळाचे मैदान रद्द करण्याच्या मागणी करीता जुईनगर आणि शिरवणे ग्रामस्थांनी मनपाच्या विरोधात 11 जून रोजी धडक मोर्चा काढला होता. यावेळी मैदान बचवासाठी नवी मुंबईतील शेकडोहून अधिक ग्रामस्थ मोर्च्यात सामील झाले होते.
जुईनगर, सेक्टर-21 येथे असलेल्या भूखंडावर आत्तापर्यंत मैदानाचे आरक्षण होते. त्यानुसार, येथील नागरिक खेळासाठी, चालण्या-फिरण्यासाठी या मैदानाचा वापर करत आले आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात 2024 रोजी दाखल झालेल्या जनहित याचिकेचा दाखला घेत, या ठिकाणची माती काढण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. मात्र, या मैदानावर असलेले आरक्षण लक्षात आणून दिल्यावर ही निविदा थांबवण्यात आली होती. विशेष म्हणजे, शहर विकास आराखडा मंजुरीसाठी गेलेला असताना आणि त्यावर कोणताही निर्णय आलेला नसताना, या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले. आता पुन्हा या भूखंडावर माती काढण्याचे काम सुरू होत आहे. केवळ कंत्राटदाराचा फायदा करून देण्यासाठी महापालिका अधिकारी हे काम करत आहेत. यामुळे आमच्या गावाच्या मैदानाचा मात्र नाहक बळी जात आहे, असा आरोप यावेळी डॉ. राजेश पाटील यांनी केला. मैदान बचवासाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली होती. मैदान बचावासाठी खेळाडूंच्या अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ, राजेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख एम के मढवी, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या असंख्य ग्रामस्थ उपस्थित राहिले होते.
मोर्च्या मध्ये असणारी गद पाहता मैदान किती गरजेचे आहे हे स्पष्ट होत आहे. मैदान आहे तिथेच राहिले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आजचा मोर्चा हा कोणा एका व्यक्तीचा नसून समस्त खेळाडूंचा आहे. त्यामुळे आमची एकच मागणी आहे ती म्हणजे विकास आराखड्यातून मैदान रद्द करून मैदान आहे तसेच ठेवावे. -डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, भाजप
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai