सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 13, 2025
- 300
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा अभिनव उपक्रम
नवी मुंबई : भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने उचलले असून देशातील पहिलं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स केंद्र वाशी येथील मुख्यालयात स्थापन केले आहे. 50 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करून उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वाशी येथे करण्यात आले. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली सहकार सुरक्षा या नावाने सुरू करण्यात आलेले हे सेंटर उभारणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.
भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत, राज्य सहकारी बँकेने देशातील पहिलं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर स्थापन केले आहे. वाशी येथील स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे 50 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून हे आधुनिक आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे. सायबर हल्ल््यांची वाढती तीव्रता आणि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संदर्भात राज्य सहकारी बँकेने उचललेले पाऊल महत्त्वपुर्ण ठरले असल्याचे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. सद्यस्थितीत या केंद्रामध्ये राज्य सरकारी बँकेचे 35 तांत्रिक कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. भविष्यात सहकारी क्षेत्राच्या गरजेनुसार याची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. यासोबतच राज्य बँकेच्या सदस्य बँकांसाठी सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
सद्यस्थितीत वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता ठेवीदारांच्या गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व जिल्हा मध्यवत बँकांनी तसेच अन्य को-ऑपरेटिव्ह बँकांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने उभारलेल्या या सायबर सिक्युरिटी सेंटर सोबत ऑन बोर्ड येण्याचे आवाहन यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, शेकापाचे नेते जयंत पाटील, सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष व प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर व बँकिंग क्षेत्रातील अन्य मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
- सायबर सिक्युरिटी केंद्राचे ध्येय
राज्य बँक व इतर सहकारी बँकांना ज्ञात व अज्ञात संभाव्य सायबर हल्ल््यांबाबत आगाऊ सूचना देणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित फ्लॅटफॉर्म द्वारे सतत निरीक्षण व धोका ओळखून तत्काळ सतर्क करणे, बँकांच्या सुरक्षेची मोजणी व धोरणात्मक मार्गदर्शन करणे, 24 तास बँकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणे.
- ना नफा फक्त सेवा
राज्य सहकारी बँकेने हा प्रकल्प नफा न घेता सर्व सहकारी बँकांना व पतसंस्थांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, यामागे सहकारात सहकार हे तत्व आहे. डिजिटल बँकिंग आणि एआय युगाच्या दृष्टीने हे पाऊल संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai