वीजबिल वसुलीची धडक कारवाई

17,547  लाख रुपयांची थकबाकी ; 6,602 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

नवी मुंबई ः भांडूप परिमंडलातील लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरघुती तसेच सार्वजनिक विभागाकडे वीज बिलाची 17,547  लाख रुपयांची थकबाकी आहे. कोरोना काळातील थकबाकीमुळे हा आकडा अजून वाढला असून, वसुलीची धडक मोहीम परिमंडल अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार, 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. 6 फेब्रुवारी व 7 फेब्रुवारी 2021 रोजी तब्बल 6,602 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

महावितरणच्या भांडूप परिमंडलातील ठाणे मंडळात 34,806 लघुदाब घरघुती ग्राहकांनी वीजबिलापोटी  रु.3350.15 लाख थकविले आहेत, 6,914 लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी रु. 1205.74 लाख थकविले आहेत, 493 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी रु.153.86 लाख असे एकूण 42,213 ग्राहकांनी रु. 4709.75 लाख थकविले आहेत. तसेच 142 सार्वजनिक संस्थांनी रु 46.77 लाख थकविले आहेत. याच प्रमाणे, वाशी मंडळात 46,705  लघुदाब घरघुती ग्राहकांनी वीजबिलापोटी रु.5234.40 लाख थकविले आहेत,  11,642 लघुदाब वाणिज्यिक  ग्राहकांनी रु. 2291.98 लाख थकविले आहेत, 452 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी रु.290.17 लाख असे एकूण 58,799  ग्राहकांनी रु. 7,815 लाख थकविले आहेत. तसेच 446 सार्वजनिक संस्थांनी रु 98.78 लाख थकविले आहेत. पेण मंडळात 53,960 लघुदाब घरघुती ग्राहकांनी वीजबिलापोटी रु.3623.93 लाख थकविले आहेत, 6269  लघुदाब वाणिज्यिक  ग्राहकांनी रु. 986.41  लाख थकविले आहेत, 401 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी रु.121.02 लाख असे एकूण 60,662 ग्राहकांनी रु. 4,731 लाख थकविले आहेत. तसेच 1685 सार्वजनिक संस्थांनी रु 144.56 लाख थकविले आहेत. याबाबत ग्राहकांना अनेक वेळा पाठपुरावा केला असून शेवटचा पर्याय म्हणून 1 फेब्रुवारी 2021  पासून अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे ज्यांनी 1 एप्रिल 2020 पासून एक ही वीज देयक भरले नाहीत. त्यानुसार, गेल्या 8 दिवसात कारवाई करून अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. 

महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर याबाबत म्हणाले कि, महावितरण ही सरकारी यंत्रणा असून, ग्राहक आमच्यासाठी सर्वोपरी आहेत. वारंवार विनंती करून ही अनेक ग्राहकांनी लॉकडाउन पासून आजपर्यंत वीज देयकाचे एक ही पैसे भरले नाहीत. पण सद्यस्तिथीत लॉकडाउन नंतर कंपनीची आर्थिक स्थिती कोलमडली असून विविध खर्च भागवण्यासाठी महावितरणला कठोर पाऊले उचलावी लागत आहे. यापुढे ही मोहीम अजून तीव्र होणार असून ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी आपले थकीत वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे.
सुरेश गणेशकर, भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता