सायन्स पार्कसाठी सिडको देणार पालिकेला भूखंड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 26, 2021
- 481
नवी मुंबई ः सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी (सबडिव्हिजन) करून, विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडकोने सेक्टर-19ए, नेरूळ येथील भूखंड क्र. 50 हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिमपार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने दिलेला होता. त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने या भूखंडावर वंडर्स पार्क उद्यान विकसित केले आहे. त्यानंतर, पालिकेने वंडर्सपार्क मधील 3.4 हेक्टरक्षेत्रावर सायन्सपार्कउ भारण्याची परवानगी देण्याची विनंती सिडकोकडे केली. यानुसार सिडकोकडून काही अटींवर, 2.00 हेक्टर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सायन्स पार्क विकसित करण्याकरिता सदर भूखंड क्र. 50 ची भूखंड क्र. 50 व 50ए अशीपोट विभागणी करण्यात येणार आहे. वापर बदल करून 50ए हा 2.00 हेक्टरचा भूखंड नवी मुंबई महानगपालिकेस सायन्सपार्क विकसित करण्याकरिता हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या भूखंडाकरिता अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक 1.00 असणार आहे.
नवी मुंबईच्या पायाभूत विकासाबरोबरच शहराचा सामाजिक व सांस्कृतिक विकास साधण्यास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिलेआहे. यांस अनुसरून, वंडर्सपार्क अंतर्गत सायन्स पार्कच्या उभारणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायन्स पार्क सारख्या प्रकल्पामुळे सांस्कृतिक प्रगती बरोबरच विज्ञान विषयक दृष्टीकोन व जाणीव विकसित होण्यास मदत होणार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai