Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला प्रारंभ करताना सूक्ष्म नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून विभाग कार्यालय पातळीवर अधिक चांगले काम व्हावे यादृष्टीने स्वच्छ मंथन 3.0 या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागांमधील ही स्पर्धा 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत 6 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत येणार आहे. यामध्ये आठही विभागांनी प्रत्येक दोन महिन्यांनी होणर्या परिक्षणांती सर्वोत्कृष्ट स्वच्छ वार्डचा फिरता चषक आपल्याकडे राहील यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्वच्छता कार्याला गती द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील सर्वोत्तम प्रथम क्रमांकाचे शहर असण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला असून स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे परीक्षण अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छताविषयक कामाला अधिक सुनियोजितपणा यावा व विभागाविभागांमध्ये निकोप स्पर्धा होऊन त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता उंचाविण्यासाठी व्हावा या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ मंथन 3.0 ही विभाग कार्यालय स्तरावरील स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित सर्व अधिकार्यांशी संवाद साधत आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पर्धेची माहिती दिली. पालिकेने मागील वर्षीपासूनच विभाग कार्यालय स्तरावर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या स्वच्छ विभाग स्पर्धेच्या कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता आणत यावर्षीच्या स्वच्छ मंथन 3.0 स्वच्छता स्पर्धेसाठी स्वच्छताविषयक 21 निकष असणार असून हे निकष स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षणाच्या निकषांना अनुरुप असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. सहा टप्प्यांमधील या स्पर्धेचा प्रत्येक टप्पा हा 45 दिवसांचा असणार असून यामध्ये विभागांमार्फत कार्यवाहीचा कालावधी 30 दिवस, कार्यवाहीची माहिती गुगलशीटमध्ये दाखल करण्याचा कालावधी 7 दिवस व सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याचे मुख्यालय स्तरावरून क्षेत्रीय तपासणी व परीक्षण करण्याचा कालावधी 7 दिवस असणार आहे. प्रत्येक टप्प्यानंतर त्या टप्प्यातील सर्वोत्कृष्ट विभाग जाहीर केला जाणार असून त्यांना स्वच्छ मंथन फिरता चषक प्रदान केला जाणार आहे. जाहीर केलेल्या सहा टप्प्यांमध्ये हा चषक प्रत्येक टप्प्यातील गुणांकनानुसार सर्वाधिक गुण मिळविणार्या विभागाकडे जाणार असून सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक वेळा फिरता चषक पटकाविणार्या विभागास गौरविण्यात येऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यासाठी पारितोषिक स्वरुपात रक्कम प्रदान केली जाणार आहे. त्याचप्रमाणे विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत किती प्रमाणात स्वच्छता विषयक कामाची गुणवत्ता उंचाविली याचाही अंतिम गुणांकनात विचार केला जाणार आहे.
महत्वाची बाब
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai