राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडुंची सुवर्ण भरारी

नवी मुंबई ः तामिळनाडू (चेन्नई) येथे झालेल्या 9 व्या शूबोकॉय ओपन राष्ट्रीय कराटे प्रिमीयर लिगमध्ये महाराष्ट्रातील 11 कराटे खेळाडूनी सूवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राच्या क्रिडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 

या स्पर्धेत भारतातील 15 राज्याचा सहभाग होता. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, मणिपूर, तेलंगणा, कर्नाटक, मिझोराम, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, केरळ, तामिळनाडू या सर्व राज्यातून खेळाडू आले होते.

पुढीलप्रमाणे यामध्ये महाराष्ट्र राज्याने 10 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक पटकावले सुवर्णपदक विजेते आबिर चॅटर्जी - (9 वर्षाखालील मुले) फादर अ‍ॅग्नल स्कूल, वाशी, अथर्व वाबळे (10 वर्षाखालील मुले) सेंट मेरीज स्कूल, वाशी, वेदिका होडेकर (10 वर्षाखालील मुली) सेंट मेरीज स्कूल, वाशी, सानिया धराडे (11 वर्षाखालील मुली) सेंट मेरीज स्कूल, वाशी, यश उत्तेकर (12 वर्षाखालील मुले) सेंट झेवीयर्स ऐरोली, राज सणस (13 वर्षाखालील मुले) यशवंतराव चव्हाण स्कूल, कोपरखैरणे, दक्ष सावंत (14 वर्षाखालील मुले) सेंट मेरीज स्कूल, वाशी, सोहम सरवणकर (14 वर्षाखालील मुले ब्लॅकबेल्ट) सेंट मेरीज स्कूल, वाशी, सिदधेश सरवणकर (16 वर्षाखालील मुले ब्लॅकबेल्ट) सेंट मेरीज स्कूल, वाशी, गौरव यादव (17 वर्षाखालील मुले ब्लॅकबेल्ट) टिळक इंटरनॅशनल स्कूल वाशी, 

रौप्यपदक विजेते राफेल नडार (10 वर्षाखालील मुले) अंजुमन स्कूल, वाशी,

पदक प्राप्त खेळाडूना गोल्डन डायमंड मार्शल आर्टसचे ग्रॅडमास्टर आप्पा चिकणे, शिहान शिवाजी ढवळे, सेन्साई शंकर शेलार, आनंद कुमार सोनी, इन्स्ट्रक्टर मारूती पाटील, महेश दाभाडे, सचिन औताडे, अभिजीत घाडगे आदीचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूचे सर्वत्र कौतूक होत आहे. या खेळाडूचे डेहराडून येथे होणार्‍या इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.