Breaking News
शहरात केवळ 42 सेप्टीक टँक ; 100 टक्के घरात वैयक्तिक शौचालय असलेले शहर बनणार
नवी मुंबई : देशातील पहिले सेप्टीक टँक मुक्त शहर व 100 टक्के घरांमध्ये शौचालय असणारे शहर होण्याच्या दृष्टीने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. झोपडपट्टी परिसरातही घरगुती शौचालयांची निर्मीती केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त 42 सेप्टीक टँक असून त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे.
सन 2015 मधील सर्वेक्षणानुसार 5774 कुटूंबे उघडयावर शौचास जात असल्याचे आढळून आले होते. तथापि नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबध्द कार्यवाही करीत हे प्रमाण शून्यावर आणण्यात यश मिळविले. याकरिता नागरिकांना त्यातही प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात सार्वजनिक व सामुदायिक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी 406 सार्वजनिक व सामुदायिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून 4340 सीट्स उपलब्ध आहेत. त्यातही हागणदारीमुक्त शहराचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून घरोघरी वैयक्तिक घरगुती शौचालये उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेली वैयक्तिक घरगुती शौचालय अनुदान योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबध्द आखणी करण्यात आली. या योजने अंतर्गत केंद्र सरकारमार्फत रू. 4 हजार, राज्य सरकार मार्फत रू. 8 हजार व नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत रू. 5 हजार असे एकूण रु. 17 हजार इतकी रक्कम अनुदान स्वरूपात दोन टप्प्यात घरगुती शौचालय बांधण्याकरिता लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका झोपडपट्टी क्षेत्रात आत्तापर्यंत 1682 घरांमध्ये वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यात आली असून मे. शेल्टर असोसिट्स, पुणे यांच्यामार्फत सीएसआर निधी अंतर्गत 4024 वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आलेली आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरभर मलनिस:रण वाहिन्यांचे जाळे तयार केले आहे. 2015 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात 5744 कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले होते. 100 टक्के घरांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर सेप्टीकमुक्त करण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. सद्यस्थितीमध्ये दिघा व काही झोपडपट्टी परिसरामध्ये एकूण 42 सेप्टीक टँक आहेत. त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे पसरलेले असून 7 अत्याधुनिक सी-टेक मलप्रक्रिया केंद्राव्दारे दररोज निर्माण होणा-या 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. विशेष म्हणजे शहरात आता केवळ 42 सेप्टीक टँक असून तेही त्या भागात मलनि:स्सारण वाहिन्या टाकून बंद करण्याची कार्यवाही गतीमानतेने करावी असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.
दिघा विभागात 29 कोटी खर्च करून मलनि:स्सारण वाहिन्या, मलउदंचन केंद्र बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवी मुंबई शहर 100 टक्के घरत वैयक्तिक शौचालय असलेले शहर तसेच 100 टक्के सेप्टिक टँकमुक्त शहर म्हणून लवकरात लवकर नावाजले जावे यादृष्टीने जलद कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai