Breaking News
नवी मुंबई : घणसोलीमध्ये वीजहानी जास्त असल्यामुळे वीजचोरी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये 77 लाख रूपयांची 146 प्रकरणे तर अनधिकृत वीजवापराची 26 प्रकरणे उघडकीस आणली होती. त्याअंतर्गत, साधारणतः 12.95 लाख रूपयांची दंडात्मक रकमेची वीजबिले दिली होती. अशी एकुण तब्बल 90 लाख रूपयांची वीजचोरी व अनधिकृत वापराची एकूण 175 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. यातील 129 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाढत्या वीजचोरी प्रकरणांमुळे भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी घणसोलीमध्ये वीजचोरी मोहिम राबविण्याच्या सुचना दिल्या होत्याय त्यानुसार वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता, सिंहाजीराव गायकवाड यांनी मंडळ कार्यालय स्तरावर वाशी विभाग व नेरूळ विभाग यांचे संयुक्त सहकार्याने वीजचोरी मोहिम राबविली होती. यामध्ये यामध्ये कलम 135 अंतर्गत 77 लाख रूपयांची 146 प्रकरणे तर कलम 126 अंतर्गत अनधिकृत वीजवापराची 26 प्रकरणे उघडकीस आणली होती. त्याअंतर्गत, साधारणतः 12.95 लाख रूपयांची दंडात्मक रकमेची वीजबिले दिली होती. अशी एकुण तब्बल 90 लाख रूपयांची वीजचोरी व अनधिकृत वापराची एकूण 175 प्रकरणे उघडकीस आणली. ग्राहकांनी वीजचोरी प्रथमतःच केली असता कायद्याने सदर गुन्हा कंपाऊडींग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. वीजचोरीचे वीजबिल व कंपाऊडींग रक्कम न भरलेल्या ग्राहकावर वीजकायदा 2003, कलम 135 अंतर्गत एफआयआर करण्यात येतात. घणसोली मधील उघडकीस आणलेल्या 146 प्रकरणतील 129 ग्राहकानी वीजचोरीचे वीजबिल अथवा कंपाऊडींग अथवा दोन्ही भरलेले नसल्यामुळे घणसोली शाखेचे सहाय्यक अभियंता सुनिल सरोदे, यांनी वाशी पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केले. या कामी त्यांना अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोफणे तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ,अश्विनी शेवाळे, सहाय्यक लेखापाल, राखी चोगुले, उच्चस्तर लिपीक, निलेश कराळे यांची मदत झाली.
वीजचोरी ही कीड असुन ही समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी प्रामाणिकपणे वीज वापर करून विजबिल वेळेत भरावे. कोणत्याही वेगवेगळ्या युक्त्या वापरून वीजचोरी केली तरी महावितरण कंपनी ती शोधून काढणारच, तेव्हा वीजग्राहकांनी वीजचोरीसारख्या समाजहितास व आत्मसन्मानास हानिकारक असलेल्या बाबी पासून दूर रहावे, असे आव्हान त्यांनी ग्राहकांना केले व विजचोरी विरूध्द मोहीम अशीच पुढे चालू ठेवण्याच्या सूचना मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai