सीवूड्स येथे हॅप्पी प्लॅनेटचे आऊटलेट सुरु

नवी मुंबई : हॅप्पी प्लॅनेट या मुलांसाठी, तसेच प्रौढ व्यक्तींना इनडोअर खेळाची सुविधा देणार्‍या पुरस्कार-विजेत्या ब्रॅण्डने ग्रॅण्ड सेंट्रल मॉल, सीवूड्स येथे त्यांचे आऊटलेट सुरू केले आहे. प्रख्यात सेलिब्रिटी व अभिनेत्री तनाज इराणीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

नवी मुंबईतील सीवूड्स येथे सुरू करण्यात आलेले आऊटलेट भारतातील चौथे, तर शहरातील तिसरे आऊटलेट आहे. आलेल्या या 9000 चौरस फूट जागेवरील आनंदी गंतव्यामध्ये जम्पोलेन, आइसलँड, बबल फन, स्लाइडलँड, मॅजिक बॉल स्प्रे ट्रेन अशा आनंदमय सुविधांचा समावेश आहे. हॅप्पी प्लॅनेटचे खास आकर्षण म्हणजे वाढदिवस सेलिब्रेशन्स. प्ले पार्कमध्ये किशोरवयीन मुलांसाठी खास आकर्षण असलेले आर्केड झोन देखील आहे. यामध्ये वॉटर शूटिंग, बॅटमन व मिनीयन अशा खेळांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त हॅप्पी प्लॅनेटला भारतात पहिल्यांदाच स्कायराइडर ही अनोखी अ‍ॅक्टिव्हीटी सादर करण्याचा अभिमान वाटत आहे. या ठिकाणी व्यक्तीला जणू तो आकाशात उडत असल्याचा अनुभव मिळू शकेल. हॅप्पी प्लॅनेटचे सह-संस्थापक निमिष केनिया म्हणाले, ‘‘ हे आऊटलेट सर्व प्रकारच्या मौजमजेसाठी एक थांबा गंतव्य आहे. या अद्ययावत खेळाच्या क्षेत्रामध्ये लहान मुले, किशोरवयीन मुले, तसेच मनाने तरूण असलेल्या प्रौढ व्यक्ती अशा सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अ‍ॅक्टिव्हीटीज आहेत. मॉलमध्ये येणार्‍या कुटुंबांना सर्वांगीण अनुभव देण्याचा आमचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते आपल्यासोबत मौजमजेने परिपूर्ण अनुभव घेऊन जातील.’’   

तनाज इराणी म्हणाल्या, ‘‘मी वयाने मोठी असली तरी मला देखील गॅझेट बाजूला ठेवून माझ्या मुलांसोबत प्ले पार्क्समध्ये खेळायला आवडते आणि हॅप्पी प्लॅनेट आम्हाला नेहमीच आनंद देते. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी असलेल्या व्यापक व विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हीटीजमुळे हे खेळाचे क्षेत्र इतरांपेक्षा वरचढ ठरते.’’