खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अवैध गुटखा विक्री करणार्‍यांवर कारवाई

5 आरोपींकडून गुटखा साठ्यासह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-1 च्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये छापा टाकून राज्यात बंदी असलेला गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणार्‍या तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून गुटख्यासह सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, नवी मुंबई शहरात पोलिसांची अशा अवैध गुटखा विक्री करणार्‍यांवर कारवाई कायम सुरुच राहणार असल्याचेही पोलीस आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले. 

तुर्भे, उरण आणि कोपरखैरणे भागात राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा व पानमसाला विक्री केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-1च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भगवान तायडे यांच्या पथकाने छापा मारुन तुर्भे गावातील जैन मंदिराजवळील भंगार गल्लीतून विनोदकुमार दिपचंद जैन (45) याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता विनोदकुमार जैन याच्याकडे 2 लाख 1 हजाराचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त केला. 

गुटखा विक्रिच्या दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस हवालदार शशिकांत जगदाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने उरणमधील आनंदनगर परिसरातून अवनीकांत गिरी (36) आणि नईम यामीन अन्सारी (23) या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी दोघा आरोपींकडून 3 लाख 11 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला साठा जफ्त केला. तर तिसर्‍या गुन्ह्यात गुन्हे शाखा-1 चे पोलीस हवालदार रवींद्र सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे डी-मार्ट चौकात दोन व्यक्ती त्यांच्याजवळ असलेल्या टेम्पोमधून गुटख्याची अवैध वाहतूक आणि पी करीत असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने 9 डिसेंबर रोजी सदर ठिकाणी छापा मारुन रोहित रामआशिष गुप्ता (26) आणि मेहबूब अली युसुफ सयद (36) या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी सदर दोघांकडे 3 लाख 26 हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळला. त्यामुळे पोलिसांनी सदर गुटखा साठा जप्त करुन दोघा आरोपींना अटक केली आहे. 

अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने 3 गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 8 लाख 38 हजाराचा गुटखा साठा तसेच टेम्पोसह एकूण 10 लाख 88 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले.  याप्रसंगी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गुटखा बंदी पोलिसांसमोर आव्हान 

 महाराष्ट्र शासनाने आदेशान्वये राज्यात गुटखा, पानमसाला याच्या विक्रीकर प्रतिबंध लावलेला आहे. ती एकप्रकारे गुटखा बंदी असताना देखील छुप्या पध्दतीने प्रतिबंधीत गुटखा आणि पानमसाल्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे पोलीस कारवाईवरुन उघड झाले आहे. पण, पोलिसांची कारवाई होऊन देखील गुटख्याची विक्री होतच आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा गुटखा विक्रीवर शंभर टक्के बंदी करु शकत नाही. नव्हे तर शंभर टक्के गुटखा बंदी पोलिसांसमोर आव्हान आहे, असे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले. 

 गुटखा विक्रीला उत्तेजन मिळणारे प्रमुख कारण म्हणजे नागरिकांकडून गुटख्याला असलेली मागणी आहे. त्यामुळे गुटख्याला डिमांड असल्याने तेव्हढीच सप्लाय देखील आहे.  पोलिसांची अवैध गुटखा विक्री विरोधात सातत्याने कारवाई होतच राहिल. यासाठी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याचाही विचार करुन गुटखा-ड्रग्ज विकत घेणे बंद करुन त्याचे सेवन करणे टाळावे. गुटखा खाण्याची सवय मोडल्यास त्याचा निश्चितच स्वत:सह समाजाला फायदा आहे, असेही पोलीस आयुक्त सिंह म्हणाले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट