13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2025
- 288
बेलापूर सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई
नवी मुंबई ः प्रत्यक्षात वस्तू किंवा सेवा न मिळवता 73.35 कोटी रुपयांच्या खोट्या व बनावट पावत्यांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या मे.संत ट्रेडिंग कंपनीवर बेलापूर सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारुन 13.20 कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनंतर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांंनी सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.
बेलापूर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मोबाईल रिचार्ज व टेलिकॉम सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या संत ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयावर गत आठवड्यात छापा मारला होता. तसेच या कंपनीच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली होती. या तपासणीत मे. संत ट्रेडिंग कंपनीने मि. जेट लाइनर एव्हिएशन टेक्निक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेसोबत बेकायदेशीर व्यवहार केल्याचे तसेच सदर कंपनीने कोणत्याही वस्तूंचा प्रत्यक्ष व्यापार किंवा व्यवहार केला नसल्याचे आढळून आले.
अधिक तपासात सदर कंपनीने 73.35 कोटी रुपयांच्या खोट्या व बनावट पावत्यांचा वापर करुन 13.20 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळून आले. त्यानंतर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी मे. संत ट्रेडिंग कंपनीविरोधात 19 जून रोजी 2017 मधील कलम 132 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करुन कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
चौकशीअंती कोणताही इनवर्ड सप्लाय घेतलेला नसताना बनावट इनव्हॉइसच्या आधारे आरोपीने ही फसवणूक केल्याचे कबुल केले. दुसऱ्या दिवशी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 3 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीजीएसटी विभागाकडुन या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai