बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर छापा

पनवेल : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कमांक 2, पनवेल, जि.रायगड या कार्यालयालास गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार 20 मार्च रोजी नदीकाठी असलेले शेतघर, खैरवाडी, पो. मोर्बे, ता पनवेल येथे छापा मारला. याठिकाणाहून उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करुन बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार केलेल्या मद्याच्या सुमारे 750 व 1000 मि. ली. क्षमतेच्या एकूण 110 बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याचे साहित्य, एक चारचाकी वाहन व एक मोबाईल असा सूमारे 13,24,860 किमंतीचा व रोख रक्कम 18,350 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शिबिन दिनेश तिय्यार (27)रा.खारघर, सुशिलाल सुकुमार तिय्यार(33)रा. खारघर, यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील फरार आरोपी प्रजीब प्रभाकरण के व जागा मालक यांस अद्याप अटक झालेली नाही. सदर गुन्हयातील जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची (स्कॉच) कोण कोणत्या भागात विक्री केलेली आहे याचा तपास चालु आहे. सदर गुन्हयामध्ये आंतराष्ट्रीय टोळी असल्याची दाट शक्यता आहे .सदरील गुन्हयाचा पुढील तपास किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.