अबोला

नको अबोला नको दुरावा
हवा तूझाच सहारा..
वाट चुकलेल्या पक्षाला 
मिळतो वृक्षाचाच निवारा...
दुरुन बोल तू चिडून बोल तू
पण हा अबोला सोड तू...
वाहणार्‍या गोड नदीला 
सागरा कवेत घे तू...
दबक्या पावलांनी 
नकळत तू यावे
काही कळण्याआधीच
मला मिठीत घ्यावे....
मोना विलास सणस