चाफ्याचे झाड

मीरा के बोल 

अंगणात माझ्या लावलाय मी
चाफा तुझी आठवण म्हणून,
रोज दिसतो मला तो वेगळा
जणू चेहरा तुझा पाहते जवळून..

एकदा तर बोलला माझ्याशी चक्क
हळुवार अलगद स्पर्शाने फक्त
सांगुन गेला बरंच काही 
सगळेच शब्दात मांडता येत नाही...

त्याची सावली आहे भली मोठी
पण उबदार अगदी तुझ्या मिठीसारखी
त्याचा रुबाब पाहून आसमंत झुकते
चांदणे ही त्याच्या प्रेमात असते...

अश्या या चाफ्याला मी खुप जपलय
तुझ रूप समजून मनात साठवलय
आपल्या प्रेमाची फुलं बहरतात त्यावर
ये कधी तू ही मीरेच्या उंबरठ्यावर ...

 मीरा पितळे