Breaking News
पनवेल ः खांदेश्वर स्टेशन येथील रेझिंग डे च्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक मालक यांना नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले.
भाडे नाकारणे. गणवेश परिधान करणे, मोबाईलवर न बोलणे, रिक्षा स्टॅन्ड जवळ बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणे, नागरिकांची सौजन्याने वागणे, रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण, तंबाखू व मद्यपान पासून दूर राहण, या सर्व सूचना नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, साठे यांनी रिक्षाचालकांना दिल्या. तसेच या सर्व सूचनांचा पालन आम्ही रिक्षा चालक काळजीपूर्वक करू असे आश्वासन दिले.
यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील. रिक्षाचालक भरत कावले, हनुमान भगत, दीपक पाटील, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, राम भगत, विलीन धूंद्रेकर, मिलिंद भगत, प्रवीण तेरडे, संदीप तांबडे, श्रीकांत कावळे, अशोक म्हात्रे, सचिन पाटील, कृष्णा तांबडे, मनोहर म्हात्रे, हरीश म्हात्रे, दिनेश भगत, भगवान पाटील, गौरव भगत, योगेश तांबडे, अनिल पाटील, बाबुराव पाटील, संजय हुद्दार, संतोष पाटील, चंद्रकांत भगत, भाई पाटील, बाबुराव नाईक, रोशन पाटील, रुपेश पाटील, शिवाजी म्हात्रे, ज्ञानेश्वर भगत हे सर्व रिक्षा चालत ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai