पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2025
- 198
पनवेल ः गुन्ह्यामध्ये कलम वाढविण्याची तसेच जामीन नामंजूर करण्याची भीत दाखवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (वर्ग-2) सचिन वामन वाईकर यांनी तक्रारदारांकडून 1 लाख रुपयांची मालणी केली होती. त्यातील 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वाईकर यांना अटक केली.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या वडिलांविरोधातील जमीनीच्या सातबाराच्या नोंदी संदर्भातील एक प्रकरण दाखल होते. संबंधित गुन्हा दाखल झाल्यावर उपनिरीक्षक वाईकर याने तपासादरम्यान संशयीत आरोपींकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते. सोमवारी पुन्हा एकदा उपनिरीक्षक वाईकर याने अटक न करण्यासाठी, गंभीर कलम न वाढवून अटक करण्याची भिती दाखवली होती. यामुळे उपनिरिक्षक वाईकर याने लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केल्यानंतर अखेर तक्रारदाराला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली. लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी पनवेल शहरातील उरणफाटा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पंचासमोर उपनिरीक्षक वाईकर याने केलेल्या लाचेच्या मागणीची खातरजमा केली.
या पडताळणीमध्ये सुरूवातीला उपनिरीक्षक वाईकर याने 1 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 50 हजार रुपये स्विकारण्याचे ठरले. लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर रात्री साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज /चौकामध्ये लाचेची रक्कम घेण्यासाठी उपनिरीक्षक वाईकर यांनी आपल्या खासगी मोटारीतून खाजगी व्यक्ती रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (रा. करंजाडे) याच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली. तातडीने पोलिसांनी त्याला पकडले. रायगड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपअधीक्षक सरीता भोसले यांच्यासह पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, महेश पाटील, आणि पोलीस शिपाई नवदीत नांदगांवकर हे उपस्थित होते. कोणत्याही लाचखोरीच्या प्रकाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री 1064, दूरध्वनी 022- 20813598/20813599, व्हॉट्सॲप 9930997700, संकेतस्थळ यावर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक शिवराज पाटील यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai