Breaking News
नवी मुंबई : राज्यातील पर्यटन उद्योगाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील खाजगी आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या पर्यटन विषयक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रतिमानिर्मिती आणि ब्रँडिंगसाठी खास धोरणे अंमलात आणली जात आहेत.
या योजनेअंतर्गत स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांना अनुदान व सहकार्य दिले जाणार आहे. यात खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था व अन्य आयोजक समाविष्ट आहेत. पर्यटन व सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, खाद्य महोत्सव, क्राफ्ट व हँडीक्राफ्ट प्रदर्शन, इव्हेंट्स (मीटिंग, प्रेझेंटेशन, एक्झिबिशन), डिजिटल मोहिमा, मीडिया टूर, फॅम टूर, इत्यादी उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग वार्षिक पर्यटन विपणन आणि ब्रँडिंग योजना तयार करणार असून, त्याअंतर्गत प्रचार उपक्रम राबवले जातील. प्लॅटफॉर्म, डिजिटल मीडिया, दूरचित्रवाणी, रेडिओ, फील्ड इव्हेंट्स व लोकशाहीरांच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटनाचा प्रचार केला जाईल. 1 लाख फॉलोअर्स असलेल्या प्रभावी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्सकडून महाराष्ट्र पर्यटनाशी संबंधित साहित्य तयार करून त्याद्वारे प्रभावी जनजागृती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील विविध संस्थांना पर्यटनविषयक कार्यक्रम आयोजनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्गदर्शन मिळणार असून, पर्यटन क्षेत्राचा विस्तार व प्रचार करण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
उच्चस्तरीय समितीची स्थापना
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai