Breaking News
पनवेल ः देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी 9' कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ‘टिफिन बैठक' पार पडली.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन बैठक' चे आयोजन केले होते. या बैठकीच्या संकल्पनेनुसार आपआपल्या घरून जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन करण्यात आले तसेच चर्चात्मक संवाद साधण्यात आले. ‘मोदी 9' कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ‘विकास तिर्थ', डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे ‘प्रबुद्ध नागरी संमेलन', प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्यांचे ‘सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन', विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रमे होणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai