Breaking News
नवी मुंबई ः महापालिका सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-1 (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काषित करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या 3 अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व मलनि:स्सारण वाहिनी खंडीत करण्यात आलेली आहे.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यांची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने वाशी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या इमारतींमध्य जय महाराष्ट्र सोसा., जे एन-2 टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, भु.क्र.4, से-09, वाशी, लिटिल फ्लॉवर को.ऑप.हौ.सो. लि., जेएन-4 टाईप (बिल्डिंग नं. 9) से.9, वाशी. सी 1 व सी 2 टाईप, बिल्डींग नं-1 ते 12, सेक्टर-02, वाशी या 3 इमारतींचा समावेश आहे. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील पाणी पुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग व मलनि:स्सारण विभाग यांचे अधिकारी/कर्मचारी, स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे पोलिस कर्मचारी उपस्थति होते.
सध्या पावसाळा सुरु झाला असून नमुंमपा कार्यक्षेत्रातील इतर अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवास करणाऱ्या नागरिकांनी रहिवास वापर थांबवून इमारत खाली करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. यापुढील काळात अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai