Breaking News
25 वर्षांपूव, म्हणजेच सन 2000 मध्ये, भारताची अर्थव्यवस्था केवळ 0.47 ट्रिलियन डॉलर इतकी होती आणि भारताचा क्रमांक जगात 13 वा होता. 11 फेब्रुवारी 2000 रोजी सेन्सेक्स 6000 अंकांपर्यंत पोहोचला होता. त्याचवेळी च्या माहितीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड्स (सह) चे एकूण फक्त 34,000 कोटी इतके होते. पण आता, मार्च 2025 मध्ये, भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं 65.74 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं आहे. या 25 वर्षांत, म्युच्युअल फंडांनी सरासरी 17% परतावा दिला आहे.
या कालावधीत भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत जगात चौथ्या क्रमांकावर (4.19 ट्रिलियन डॉलर) पोहोचली आहे. या 25 वर्षांत अनेक सरकारे आली आणि गेली, पण भारताचा आर्थिक विकास अखंडपणे पुढेच जात राहिला. भारत सध्या जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरुण लोकसंख्या, वाढती मध्यमवगय संख्या, डिजिटल प्रगती आणि सरकारच्या ठोस सुधारणा यामुळे भारताचा आर्थिक विकास खूप मजबूत होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेनेही भारताचा विकासदर सतत उच्च राखला आहे.
तंत्रज्ञान, उत्पादन, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), आणि नविन उर्जाक्षेत्र (रिन्युएबल एनज) अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारत झपाट्याने पुढे जात आहे. “मेक इन इंडिया”, “डिजिटल इंडिया” आणि स्टार्टअपला चालना देणाऱ्या योजनांमुळे भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. म्युच्युअल फंड, विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंड हे भारताच्या आर्थिक प्रगतीत सामील होण्यासाठी एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. व्यावसायिक व्यवस्थापन, गुंतवणुकीचा विविधिकरण (डायव्हर्सिफिकेशन), आणि पारदर्शकता यामुळे म्युच्युअल फंड छोट्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतात. सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि भारत हे योग्य ठिकाण आहे. भारताच्या प्रगतीसोबतच तुमच्या गुंतवणुकीची किंमतही वाढत जाते म्हणजेच, तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणूक करत आहात.
अजूनही तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीबाबत शंका आहे असेल तर जे जाणून घ्या की, जेव्हा भारत 13 व्या स्थानावर होता तेव्हा 17% सरासरी परतावा मिळाला, आज आपण 4थ्या स्थानावर आहोत भविष्यात परतावा किती असू शकतो याचा अंदाज लावा. भारताच्या विकासावर विश्वास ठेवा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची ताकद ओळखा. आपल्या गुंतवणुकीसोबत भारतही प्रगती करणार आहे.
- सुशांत पटनायक, प्रोपराइटर, रिलायबल इन्व्हेस्टमेंट
अस्वीकरण: ही माहिती AMFI, BSE व सरकारी स्त्रोतांवर आधारित असून केवळ माहिती व शैक्षणिक हेतूसाठी दिली आहे. हे अचूक व विश्वसनीय आहे याची हमी दिली जात नाही. कृपया गुंतवणुकीपूव सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai