Breaking News
पनवेल महसूलच्या कामकाजाची देोन विभागात विभागणी
पनवेल ः पनवेलच्या महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता यावी म्हणून शासनाने पनवेल तहसिलच्या कामकाजाची देोन विभागात विभागणी केली आहे, शासनानेे परिपत्रक काढून या विभाजनाला शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता पनवेलला तहसीलदार व अपर तहसीलदार असे दोन अधिकारी मिळणार आहेत.
दिवसेंदिवस होणारे नागरिकरण आणि कामकाजाचा पसारा पहाता पनवेल तालुक्याचे महसूल विभागाच्या सोयीसाठी विभाजन करण्यात आले आहे. अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करून तहसीलदारपदाच्या जबाबदाऱ्या तहसीलदार आणि अपर तहसीलदार अशा दोन विभागांत वाटून देऊन पनवेल तालुक्याचे महसूल प्रशासनासाठी दोन गट पाडण्यात आले आहेत. पनवेल तहसिलदार यांच्याकडेे 86 महसुली गावे त्यामध्ये पनवेल, तळोजा, ओवळे, कळंबोली, पळस्पे ही महसूल मंडळे तर पनवेल अपर तहसिलदार यांच्याकडे 102 महसुली गावे त्यामध्ये कर्नाळा, पोयंजे, मोरबे, दापिवली, नेरे ही महसूल मंडळे येतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचे नैना क्षेत्र, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग, कोकण रेल्वे अल्पावधीतच होण्याच्या झपाट्याने होतो आहे. नागरिकरणासोबत आदी महत्त्वाचे प्रकल्प तालुक्यातील 29 गावांची पनवेल महापालिका मार्गावर असलेली नवी मुंबई मेट्रो आदींमुळे पनवेल तालुक्याचा विकास, औद्योगिकरण वाढते आहे.स्थलांतरित होणार्या लोकसंख्येची भर पडत असल्यामुळे पनवेल तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयावर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.
महसूल विभागाच्या कामात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कामात सुलभता येऊन नागरिकांची कामे सुरळीत व्हावीत म्हणून पनवेल तालुक्याचे विभाजन करणे गरजेचे होते. तालुक्याचे विभाजन होणार, ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर सरकारने यावर शिक्कामोर्तब करून पनवेलमध्ये अपर तहसील कार्यालयाची स्थापना करून आवश्यक पदांची निर्मिती केली.नव्या कार्यालयात अपर तहसीलदार आणि लिपिक टंकलेखक अशी दोन पदे तयार करण्यात आली आहेत. 188 गावांच्या 10 मंडळांचे दोन गटांत वाटप करण्यात आले आहे.पनवेल प्रांतअधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत दोन्ही तहसीलदार कार्यालयाचा कारभार चालेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai