Breaking News
पनवेल ः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पनवेल एसटी बस डेपोच्या पुनर्विकासाच्या कामावरून ठेकेदाराला अल्टिमेटम देण्यात आला आहे. या विषयावरून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली असून 15 दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल एसटी स्थानकात मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील बस येत असतात. त्यामुळे 2016 मध्ये पनवेल बस स्थानकाच्या बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्त्वावर पुनर्विकासासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामास कोणत्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नवीन बस स्थानकाच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी गेली सहा वर्षे विविध गैरसोयींचा सामना करत आहेत. त्यामुळे अनेक वर्षे पाठपुरावा करूनदेखील अद्याप पुढील कार्यवाही झाली नसल्याने प्रशांत ठाकूर यांनी परिवहन विभागाला आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai