Breaking News
उपसले आंदोलनाचे हत्यार
नवीन पनवेल ः पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामाचा ठेका गेल्या तीन महिन्यांपासून संपलेला आहे. ठेक्याचे नूतनीकरण झाले नसल्याचे संबंधित कंपनीने कामगारांना सांगितले नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील 18 कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.
कोरोनाकाळात अतिरिक्त आरोग्यसेवा असावी म्हणून कंत्राटदाराच्या माध्यमातून अधी परिचारिका कर्मचाऱ्यांना नियुक्त केले गेले होते. दोन महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतन मिळाले नसल्याने त्यांनी आंदोलन करत संपाचा बडगा उगारला आहे. यामध्ये परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण भार दहा ते बारा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर पडला असून त्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला कायम असणारे डॉक्टर, परिचारिका आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा सुरळीतपणे सुरू असल्याचे तेथील अधीक्षक, डॉ. मधुकर पांचाळ यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai