Breaking News
पनवेल : महापालिका स्थापन झाल्यापासून सहा वर्षे उलटली, तरी पालिका आस्थापनेवर भरती प्रक्रीया झाली नव्हती. अखेर पनवेल पालिका प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी जाहीरात प्रसिद्ध करुन गट ‘अ' ते गट ‘ड' मधील रिक्त 377 पदांसाठी सरळ सेवेमार्फत थेट भरतीची प्रक्रिया जाहीर केली. 13 जूलै ते 17 ऑगस्ट या दरम्यान उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येणार आहेत.
2016 मध्ये स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक कामांवर त्याचा परिणाम होत आहे. पालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची संख्या वाढली आहे. यामुळे या रिक्त पदांवर तात्काळ पदभरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. यानुसार पालिका प्रशासनाकडून पनवेल महापालिकेमधील वर्गवारीनुसार रिक्त मंजूर व भरलेल्या पदांचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने संवर्ग मध्ये एकूण 377 जागांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी महिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली असून पदभरतीची जहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती प्रकियेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सूरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकीसेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निम वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परिक्षण सेवा इत्यादी विभागातील पदांकरीता भरती होणार आहे. सर्वाधिक जागा लिपिक टंकलेखक गट(क) 118, त्यानंतर अग्निशामक गड- ड 72, चालक यंत्र चालक गट-क 31 भरण्यात येणार आहेत. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रीया होण्यासाठी ही जाहीरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ुुु.रिर्पींशश्रलेीेीिरींळेप.लेाया संकेतस्थळांवर 17 ऑगस्टपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परिक्षेचे ठिकाण आणि वेळ इमेल व एसएमएस व्दारे कळविण्यात येणार आहे. निवड प्रक्रीयेत मौखिक परिक्षा घेतली जाणार नाही. मात्र निवडसूचीतील उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी (केवायसी व्हेरीफीकेशन) मुलाखत घेतली जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai