Breaking News
नवी मुंबई ः सिडको महामंडळाने विविध संवर्गाअंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्याअंतर्गत मे. आयबीपीएस यांच्या सहयोगाने दि. 10 जून 2025 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, मिरा भाईंदर येथील विविध परीक्षाकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सिडकोने रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक अनुभवी, हुशार व आपल्या विषयाचे उत्तम ज्ञान असलेल्या उमेदवारांचे सिडकोसारख्या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या महामंडळामध्ये काम करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी व्यक्त केले.
सिडको महामंडळातील लेखा लिपिक, व्यवस्थापक (प्रणाली), प्रणाली विश्लेषक, सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार व क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) या 62 रिक्त पदांसाठी अंदाजे 6 हजार अर्जदारांनी अर्ज सादर केले होते. सदर ऑनलाईन परीक्षेसाठीदेखील अर्जदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सर्व परिक्षा केंद्रांवर पोलिसांच्या सहाय्याने परीक्षा शांततेत पार पडली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai