जिजाबाई

मीरा के बोल
साकडं घातलं भवानीला
म्हणाली वरदान दे ह्या आईला
जन्माला येऊदे सूर्य पोटी माझ्या
जपेलतो जिवापाड भगव्याला तुझ्या ...
ती आई होती स्वराज्यजननी
नांदे सुख जीच्या अंगणी
एकच ऊहूररी होता मनी तीच्या
होती ती निडर महाराणी जीजा ...
जीजा म्हणजे मायेचा सागर
दुधात जशी विरघळे साखर
जीजा म्हणजे एक लखलखती बिजली
तलवार जिच्या कमरेस शोभली ...
तीने घडवला इतिहास
शिवबास केल महाराज
हर एक गुण पेरला खुप कटाक्षाने
स्वराज्य उभारले प्रचंड कष्टाने...
मी माझा मुलगा गमावला तरी बेहत्तर
पण ह्या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावणं
मला मान्य नाही ...
अशी वाघीण लाभली आई म्हणुनी
परस्त्रीला ओळखे शिवबा माता म्हणूनी..
शिवाजी जन्मो दुसर्याच्या घरी
अशी जर म्हणाली अस्ती ती
तर घडल नस्तच शिवपुराण
अश्या हया मातेला शतशत प्रणाम !!!!

मीरा पितळे