Breaking News
बुडापोस्ट ः जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी 5 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदके पटकावताना आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खेळाडूंच्या या सरस कामगिरीचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले असून, आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रविवारी प्रिया मलिकने 73 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसची कुस्तीपटू सेनिया पट्टापोविचला 5-0 असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले होते. या स्पर्धेत प्रिया मलिकसह युवा कुस्तीपटू तनू हिनेही जागतिक कॅडेट गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. तिने 43 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या वेलेरिया मिकित्सिचला पराभूत केले. त्याचबरोबर कोमल पांचाळनेही 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. अन्य दोन महिला कुस्तीपटू वर्षा (65 किलो वजनी गट) आणि अंतिम (53 किलो वजनी गट) यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघ पदकतालिकेत दुसर्या स्थानावर राहिला. अमेरिका संघाने पहिले, तर रशियाने तिसरे स्थान मिळवले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai