भारताला पुन्हा कांस्य पदक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 30, 2024
- 514
नेमबाज मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने रचला इतिहास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (2024) मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.
भारताची पाच फेरीत आघाडी-
पहिली फेरी-
- भारत- 18.8
- दक्षिण कोरिया-20.5
दुसरी फेरी-
- भारत-21.2
- दक्षिण कोरिया- 19.9
तिसरी फेरी-
- भारत- 20.8
- दक्षिण कोरिया- 19.8
चौथी फेरी-
- भारत- 20.7
- दक्षिण कोरिया- 20.5
पाचवी फेरी-
- भारत- 20.1
- दक्षिण कोरिया- 19.5
सहावी फेरी-
- भारत- 20.2
- दक्षिण कोरिया-20.6
- वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टलमध्येही मनू भाकरचं कांस्य पदक
पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेतभारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai