Breaking News
नवी मुंबई : तांत्रिक फेरफार करीत वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. मागील एप्रिल-2022 ते जानेवारी-2023 पर्यंत नेरुळ विभागामध्ये वीजचोरीची एकुण 90 अशी एकुण 395 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमधून महावितरणने एकूण 2.31 कोटी रुपयांची वसुली केलेली आहे. 19 वीज चोराविरुद्ध प्रकरणी एफआयआर दाखल केलेला आहे.
वीजचोरी मोहीम ही नेरुळ विभागामध्ये कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जाते. विशेष म्हणजे विभागामध्ये असलेल्या 9 महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असतात. वीजचोरीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेगा वीजचोरी पकड मोहीम राबविण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यअभियंता धनंजय औढेंकर यांनी दिलेल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आखण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमांना नेरुळ विभागात चांगले यश प्राप्त झाले आहे. सध्याचे कार्यरत मुख्य अभियंता सुनील काकडे यांनीसुद्धा वीजचोरी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कितीही कृत्य करून ग्राहकाने वीजचोरी केली तरी महावितरण ती शोधून काढणारच. तेव्हा सर्व ग्राहकांनी अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे वीज वापर करावा व विजबिल वेळेत भरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai