Breaking News
उरण ः अनिरुद्धाज अँकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र या उपासना केंद्राच्या सहयोगाने रविवार 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 सायंकाळी 4:30 या वेळेत उरण नगरपरिषद शाळा क्र.1, पेंशनर पार्क समोर, उरण शहर येथे भव्यदिव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 167 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र उरण व मुळेखंड उपासना केंद्रांच्या सर्व भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai