Breaking News
उरण ः हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे अनेक समस्या, प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ तसेच पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि ग्रामपंचायत बंद करणे बाबत जिल्हाधिकारी ठोस निर्णयासाठी बैठक घेत नसल्याने 15 ऑगस्ट 2025 पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करण्याचा इशारा शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने दिला आहे.
जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी 1985 ला शेवा कोळीवाडा गावाचे विस्थापन केले होते. या संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना धोकादायक घरात आपल्या कुटुंबासह जीवन जगावे लागत आहे. विस्थापित झाल्यानंतर आज पर्यंत चार पिढ्या आशा स्थितीत वास्तव्य करीत आहेत. यात धोकादायक निवाऱ्या सह विस्थापितांच्या रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासह विविध समस्या, प्रश्न प्रलंबित असल्याने शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने जेएनपीएचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन जाहीर केले आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार 17 ऐवजी केवळ 2 हेक्टर क्षेत्रातच 256 कुटुंबाचे 1985 साली पुनर्वसन करण्यात आले आहे. 1992 ला हनुमान कोळीवाडा गावातील 256 घरासह संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. कमी भूखंडावर पुनर्वसन करण्यात आल्याने अनेक कुटूंब ही अशाही परिस्थितीत दाटीवाटीने वास्तव्य करीत आहेत.
त्यामुळे 17 हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील 40 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या काळात आतापर्यंत ग्रामस्थ आणि व्यवस्थापन यांच्यात 500 हून अधिक बैठका झाल्या मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांनी खास करून महिलांनी आक्रमक होत जेएनपीए विरोधात संघर्षच सुरु केला आहे.जेएनपीएने गावाच्या पुनर्वसनासाठी विकासित 10.50 हेक्टर जमीन देण्याचे मान्य केले आहे.त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.
चौथ्यांदा जहाजे रोखण्याचा इशारा : शेवा कोळीवाडा ग्रामस्थांनी आपल्या पुनर्वसनासाठी 40 वर्षे संघर्ष करीत आहेत. यात जानेवारी 2012,2022 तसेच डिसेंबर 2023 मध्ये जेएनपीए बंदरात जगातून येणारी व जाणारी मालवाहू जहाजे समुद्रात अडवून आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत कालावधीसाठी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे जेएनपीए चॅनेल बंद करनार आहेत. गेल्या 43 वर्षात झालेल्या पुनर्वसन फसवणुक व ठकवणूकीचा सहन शीलतेचा अंत झाल्याने विस्थापितांच्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व कोणताही विचित्र प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मा. जिल्हाधिकारी व मा. अध्यक्ष जेएनपीए यांच्या वर राहील असे विस्थापित महिला संघटनेने जाहीर केलेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai