Breaking News
उरण ः राष्ट्रवादी काँग्रेस पाट तसेच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “पाककला स्पर्धा 2025“ उरण तालुक्यातील चिरनेर गावातील पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेज येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली, आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात ही स्पर्धा नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत याम ठाकुर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले तर परिक्षक म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रितमताई जाधव यांनी भुमिका पार पाडली. पाककला स्पर्धेत शेवग्याचे पकोडे, कडीपत्ता चटणी,मिक्स थालीपीठ,केशर फालुदा,चिंबो-या लालिपॉप, रव्वा आप्पे, तांदूळाचे लाडू, भाकरी, चिकन, ओले वाटण, तांदळाची खीर आदी पदार्थ बनविण्यात आले होते.पाकलला स्पर्धेमध्ये महिला भगिनींनी सर्वच पदार्थ ईतके चविष्ट बनवले होते कि परिक्षकांना कुणाला बक्षीस द्यावे असा प्रश्न पडला होता.
पाककला स्पर्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी मित्र मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेज यांनी हॉल तसेच माईक सिस्टीम, टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली. एकंदरीत पाककला स्पर्धा 2025 मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सदर पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सदर पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मोठया प्रमाणात वाव मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाट तर्फे महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमातुन नवनवीन महिला उद्योजक तयार होण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
एकुण सहभागी स्पर्धक 43,
प्रथम क्रमांक : स्नेहा नितीन ठाकुर (चिरनेर)
द्वितीय क्रमांक: राणी सागर ठाकुर (धुतूम),
तृतीय क्रमांक: प्रणाली प्रविण घरत (धुतुम),
उत्तेजनार्थ -
अर्पिता जगदिश जोशी (चिरनेर)
ज्योती सुरेश म्हात्रे (चिरनेर )
आश्विनी ज्ञानेश्वर ठाकुर (धुतुम)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai