Breaking News
उरण : मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाच्या सर्व चाचण्या होऊनही वर्षभर रखडलेला उरण-खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले. यावेळी रेल्वे आणि सरकारच्या धरसोड वृत्तीचा निषेध केला. हा रेल्वेमार्ग सुरू न झाल्याने नागरिक विद्यार्थी आणि व्यवसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये ही असंतोष निर्माण झाला आहे.
उरण मधील जनता रेल्वे सेवेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिली आहे. मात्र गेल्या वर्षीपासून रेल्वेचे काम प्रगती पथावर आहे. 6 महिन्यापूर्वी उरण ते खारकोपर रेल्वेची चाचपणी सुद्धा झाली. मात्र 6 अद्याप ही रेल्वे सेवा सुरु झाली नाही. रेल्वे प्रशासनातर्फे उद्धाटनाच्या तारखा वारंवार बदलण्यात येत आहेत. त्यामुळे उरणच्या नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. वर्षभरात सेवा सुरू न झाल्याने उरण तालुका व उरण शहर काँग्रेसने याबाबत आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गाजर दाखवा आंदोलन केले. गुरवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता उरण रेल्वे स्टेशनच्या मेन गेट समोर केंद्र व राज्य शासनाचा गाजर दाखवून निषेध केला. मोदी सरकार वेगवेगळ इव्हेंट करण्यात व्यस्त आहेत. केंद्र सरकार व राज्या सरकार हे प्रत्येक क्षेत्रात जनतेला फक्त गाजर दाखविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या सगळ्या योजना या फसव्या आहेत. कुठल्याही योजनांची सरकार अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे या फसव्या योजनांचा आम्ही गाजर दाखवून निषेध करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. जर रेल्वे सेवा त्वरित सुरु झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उरण तालुका व उरण शहर काँग्रेस तर्फे केंद्र व राज्य प्रशासनाला देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, बबन कांबळे, माजी नगरसेविका अफशा मुखरी, रेखा घरत यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai