Breaking News
उरण ः काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी एलन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी, आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येवून 28 डिसेंबर 1885 रोजी इंडियन नेशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली.स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजेच 26 डिसेंबर 1920 रोजी नागपूर मध्ये झालेल्या कॉग्रेसच्या अधिवेशनाने पक्षाला नवसंजिवनी मिळाली. त्यातून स्वातंत्र्या च्या चळवळीला बळ मिळत गेले.काँग्रेस पक्षाच्या चळवळीने, काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेल्या काँग्रेस पक्ष,पक्षाचे विचार व कार्य, पक्षातील नेते, पदाधिकारी यांचे विचार व कार्य येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे. इतिहासाचे सर्वांना स्मरण राहावे त्या अनुषंगाने भारतात काँग्रेसने वेगवेगळे उपक्रम राबवून आपला 138 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. रायगड जिल्हयात सर्वच तालुक्यात रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवा असे आवाहन काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी केले. स्वातंत्र्य काळातील काँग्रेस पक्षाचे योगदान, पक्षाचे महत्व, कार्यकर्त्यांचे त्याग याबाबतीत प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai