Breaking News
उरण : महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या न्हावा शेवा सागरी सेतूचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. यासाठी 12 जानेवारीचा मुहुर्त ठरविण्यात आला आहे. मात्र या उद्घघाटनावर आंदोलनाचे सावट पडले आहे. सेतूबाधित चिर्ले ग्रामपंचायतींच्या हद्दीत 20 कोटी खर्चाची नागरी विकास कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. मात्र ते पूर्ण न झाल्याने उदघाटनाच्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा चिर्लेमधील प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी दिला आहे.
न्हावा शेवा सागरीमुळे मुंबईहून 20 मिनिटांत नवी मुंबईला पोहता येणार आहे. शिवडी-न्हावा शेवा लिंक रोड उभारण्यासाठी शेकडो शेतकरी, मच्छीमार बाधीत झाले आहेत. यामध्ये उरणच्या चिर्ले गावाचाही समावेश आहे. सागरी सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक मच्छी न्हावा, न्हावाखाडी, गव्हाण, जासई, घारापुरी आदी गावातील शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला तर मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नसल्याने सर्वच संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. चिर्ले ग्रामपंचायतींच्या हद्दीत 20 कोटी खर्चाची नागरी विकास कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. चिर्ले, गावठाण, जांभूळ पाडा गावा दरम्यान रस्त्याचे कॉक्रीटिकरण, तलावांचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते, नाले, गटारे आदी सुमारे 20 कोटी खर्चाच्या कामांचा समावेश आहे. मात्र ते पूर्ण न झाल्याने उदघाटनाच्या वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये चिर्लेमधील प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदलाही अद्याप अदा करण्यात आलेला नाही. मोबादला आणि विकासकामे करण्याची आश्वासने तोंडी नकोत तर लेखी स्वरूपात हमी देण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ हा इशारा देण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चिर्ले ग्रामपंचायतीने दिला असल्याची माहिती सरपंच सुधाकर पाटील यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai